कर्करुग्णांसाठी सायकल मॅरेथॉन
By admin | Published: February 22, 2016 03:26 AM2016-02-22T03:26:09+5:302016-02-22T03:26:09+5:30
कर्करोग हा बरा होणारा आजार असला तरीही त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च खूप असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांना उपचाराचा खर्च करणे अनेकदा शक्य नसते.
मुंबई : कर्करोग हा बरा होणारा आजार असला तरीही त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च खूप असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांना उपचाराचा खर्च करणे अनेकदा शक्य नसते. अशा लहान मुलांना कर्करोगाच्या उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून १० जणांनी सायकल मॅरेथॉन पार करीत १ कोटी ५ लाखांचा निधी उभा केला.
कर्करोगावर योग्यवेळी उपचार झाल्यास लहान मुलांंमधील कर्करोग बरा होऊ शकतो. पण, अनेकदा पालकांकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे उपचार अर्धवट सोडावे लागतात. अशा प्रकारे लहान मुलांना उपचार सोडावे लागू नयेत म्हणून १० व्यक्ती एकत्र आल्या. डॉक्टर, अधिकारी, मॅनेजर अशा व्यक्तींनी ६० तासांचे सायकल मॅरेथॉनचे चायलेंज स्वीकारले होते. त्यांनी दिल्लीच्या इंडिया गेटपासून मुंबईच्या गेटवे आॅफ इंडियापर्यंतचा १ हजार ४९२ किमीचा प्रवास पूर्ण केला. या प्रवासात त्यांनी कर्करोग रुग्णांसाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. हा निधी त्यांनी सेंट ज्युडे या संस्थेला दिला. अरुण सैगल, जयेश मोरवणकर, निखिल राघवन, अभय नेने, नील डिसोजा, प्रशांत मेहता, अभिषेक किणी हे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
असा होता मार्ग
नवी दिल्ली - गुडगाव - भिवाडी - जयपूर - किशानघर - अजमेर - माऊंट अबू - मेहसाना - अहमदाबाद - नोएडा - आनंद - वडोदरा - भरुच - वापी - मनोर - विरार - भार्इंदर - दहिसर - वांद्रे - माहीम - वीर सावरकर मार्ग - पोदार रुग्णालय - वरळी सी फेस - हाजी अली - पेडर रोड - मरिन ड्राइव्ह - मादाम कामा रोड - गेटवे आॅफ इंडिया.