मुंबई : ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेली सायकल खरेदी करत असल्याची बतावणी करत ठगाने एका महिलेला क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून खात्यातील तब्बल ९८ हजार ९८४ रुपयांवर हात साफ केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये समोर आला. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार या एका शाळेत लिपिक आहेत.
..............
आधी चावी नंतर दुचाकीचीही चाेरी
मुंबई : मस्जिद बंदरमध्ये राहणारे ५० वर्षीय सुलेमान यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ३० मार्चला ते नेहमीप्रमाणे दुचाकी घेऊन नाश्ता करण्यासाठी येथील एका हॉटेलमध्ये आले होते. येथे त्यांच्या गाडीची चावी चोरी झाली. चावी सापडत नसल्याने त्यांनी दुचाकी ढकलत घरापासून काही अंतरापर्यंत नेली. दुचाकी तेथेच पार्क करून दुसरी चावी आणण्यासाठी ते बाहेर पडले. तोपर्यंत दुचाकीही चोरीला गेली. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.
..............