Join us

Nashik Election: सत्यजीत तांबेंवर काँग्रेसची मोठी कारवाई, महाविकास आघाडीचा उमेदवारही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 2:22 PM

शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, त्यावर महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे की नाही हे ठरणार होते.

मुंबई - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने बुधवारी घेतला होता. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत झाली. काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाहीच, हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये, महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर, सत्यजीत तांबेंवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.  6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, त्यावर महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे की नाही हे ठरणार होते. अखेर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली अन् नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शुभांगी पाटील यांच्या नावावर तिन्ही पक्षाचे एकमत झाले. यासंदर्भात नाना पटोलेंनी जाहीरही केले. त्यासोबतच, सत्याजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे, आता सत्यजित तांबे भाजपात जाणार का, हा प्रश्न उपस्थित होतं आहे.  

महाविकास आघाडीने नागपुर मतदारसंघासाठी सुधाकर आडबोलेंना पाठिंबा जाहीर केला आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात सत्यजीत तांबेंना पाठिंबा नाकारला असून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, आता महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या सत्यजीत तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार का हे पाहावे लागणार आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात बुधवारी मुंबईत एक बैठक पार पडली होती. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत आणि विनायक राऊत तर काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आता गुरुवारी शिवसेना आणि काँग्रेसचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. 

टॅग्स :काँग्रेससत्यजित तांबेनाशिकमुंबईनाना पटोले