मुंबई: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. दुबईतून आलेल्या विमानातून एका व्यक्तीकडून ५.२० कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आरोपीने हे सोनं त्यांच्या कमरेच्या बेल्टमध्ये लपवले होते. कस्टम विभानाला या प्रकरणी अगोदर माहिती मिळाली होती, त्यानुसार विभागाने सापळ रचला होता. दुबईतील विमानातून आलेल्या त्या आरोपीची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम विभागाला दुबईतून मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सोनं येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कस्टम विभागाने विमानतळावर सापळा लावला होता. दुबई विमान मुंबई विमान तळावर पोहोचताच अधिकाऱ्यांनी प्रवाशांची झडती घेतली. यावेळी एका प्रवाशाजवळ तब्बल ५.२० कोटी रुपयांचे सोने सापडले.
संजय राऊतांना आम्ही भेटल्यावर ते नेहमी 'मै झुकेगा नही' असं म्हणतात; सचिन आहिरांचा खुलासा
आरोपीने एक विशेष प्रकारचा बेल्ट घेतला होता. यात त्याने सोनं लपवले होते. कस्टम विभागाने ११ ते १२ ऑक्टोबर दरम्यान मुंबई विमान तळावर तपास मोहिम राबवली होती. या दरम्यान, कस्टम विभागाने १५ किलो सोनं जप्त केले असून याची किंमत ८ कोटी रुपये आहे. चार वेगवेळ्या प्रकरणात हे सोनं जप्त केलं आहे. यासह सात अन्य प्रकरणात २२ लाखांचे विदेशी मुल्य जप्त केले, या दोन्ही प्रकरणात ७ जणांना ताब्यात घेतले आहे.