Join us  

विश्वकपमध्ये रंगले बिग बी

By admin | Published: June 20, 2014 9:24 PM

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरापर्यंत जागून विश्वकप फुटबॉल सामन्यांचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या ट्विटरवरून हे सिद्ध होत़े

नवी दिल्ली: आपल्या आगामी सीरिअल ‘युद्ध’ चे प्रमोशन आणि शूटिंगसह आपल्या सर्व व्यस्त कार्यक्रमांदरम्यान बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरापर्यंत जागून विश्वकप फुटबॉल सामन्यांचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या ट्विटरवरून हे सिद्ध होत़ेब्राझीलमध्ये सुरु असलेल्या विश्वकपच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते आतापर्यंत खेळल्या गेलेल्या प्रमुख लढती त्यांनी ट्विट केले आहेत़ एवढेच नव्हे तर फुटबॉलचे तारे लुक्स आणि त्याच्या जर्सीवरदेखील त्यांचे ट्विट पाहण्यात आले आह़े एका ताज्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, या विश्वकपमध्ये खेळाडूंची किट सर्वाधिक आकर्षक आह़े खासकरून आफ्रिकन देश आणि त्यांचे सर्मथकदेखील त्याचप्रमाणे आकर्षक आहेत़ गत चॅम्पियन स्पेन चिलीकडून दुसर्‍या सामन्यामध्ये 2-0 ने पराभूत होऊन बाहेर पडल्यानंतरचे घटनाक्रम टप्प्याटप्प्याने ट्विट केले आहेत़ त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, विश्वकप स्पेनला कळालेच नाही की कसे खेळाव़े असे वाटत होते की संघ विजयासाठी अथवा खेळण्याच्या उद्देशाने खेळतच नव्हता़ सॉरी़़पुढील ट्विटमध्ये लिहिले की, प्रत्येक चॅम्पियन्सच्या जीवनामध्ये एक दिवस असा येतो की जेव्हा त्याला कळून चुकते की दुसरा चॅम्पियन तयार झालेला आह़े त्यांनी या पराभवाबद्दल पुढे लिहिले की, दु:खद मात्र सत्य़ स्पेन विश्वकपमधून बाहेऱ सर्वर्शेष्ठ संघाला देखील पराभवापासून रोखले जाऊ शकत नाही़ ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारच्या लुक्सचीदेखील तुलना भलेही अभिनेता कुणाल खेमूशी करीत असतील मात्र अमिताभला त्याच्यामध्ये दक्षिण भारताचा सुपरस्टार धनुषची छबी दिसून येत आह़े त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, मला असे का वाटते की, दक्षिणचा सुपरस्टार धनुषचा चेहरा ब्राझीलच्या नेमारशी मिळताजुळता आह़े विश्वकपमध्ये आत्मघातकी गोलच्या संख्येबाबत त्यांनी लिहिले की, या विश्वकपमध्ये खूपच आत्मघातकी गोल पाहण्यास मिळत आहेत़ ‘सेल्फी’ बनण्याच्या आणखी अनेक कलात्मक पद्धती आहेत़ (वृत्तसंस्था)