Join us

दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 1:10 PM

वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. या दराऐवजी  आजपासून  50.58 आणि 25.29 रुपये आकारले जातील. 

ठळक मुद्देदरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपयेगेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा ही दरवाढ झाली वितरकांचे कमिशन आजपासून 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 50.58 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 25.29 रुपये

नवी दिल्ली - केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिश्यातून वसूल करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देत अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला. या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत 505.05 रुपये झाली आहे. गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा ही दरवाढ झाली आहे.

जूनपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दर महिन्याला वाढ होत आहे. जीएसटी आणि एकूण किंमतीत 16.21 रुपयांची वाढ ही यामागची कारणं सांगून सरकारने दरवाढ केली होती. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरात आज केलेली दरवाढ ही  दुसऱ्यांदा केलेली दरवाढ आहे. वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. या दराऐवजी  आजपासून  50.58 आणि 25.29 रुपये आकारले जातील. 

 

टॅग्स :मुंबईगॅस सिलेंडर