Join us

नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेतून होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:04 IST

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Maharashtra Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.  शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत.

महसूल विभागाबाबत आजच्या मंत्रिमंडळत बैठकीत निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीत अन्य कोणते निर्णय?

महाराष्ट्र सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार असून त्याचा राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना होणार फायदा होणार आहे. राज्यातील ९६३ शेतकऱ्यांच्या ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेत संपूर्ण ९६३ शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार असल्याचं स्पष्ट केलं असून रेडीरकनरच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४देवेंद्र फडणवीससरकार