Join us

GST Bhavan : अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:26 IST

Byculla's GST Bhavan Got Fire : अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देअग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याही आग लेव्हल 3 म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई - माझगांव येथील जीएसटी भवनच्या ८ व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जीएसटी भवनात जीएसटीबाबत अनेक कागदपत्रांचा साठा असल्याने आगीचा भडका वाढला आहे. या आगीत सर्वच कागदपत्रं जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग लेव्हल 4 म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालयं आहेत. आगीची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत.

टॅग्स :आगमुंबईजीएसटीपुणे अग्निशामक दल