Join us

माटुंग्यातील बिग बाजारला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 17:41 IST

पश्चिम रेल्वे लाईनवर माटुंगा स्थानकाच्या समोरच हे बिग बाजार आहे. 

मुंबई - माटुंगा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बिग बाजारमध्ये आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी  अग्निशमन जवानांचे पथक रवाना झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे कार्य सुरु आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आगीचे प्रचंड धुराचे लोट परिसरात पसरले असून पश्चिम रेल्वे लाईनवर माटुंगा स्थानकाच्या समोरच हे बिग बाजार आहे. अद्याप या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बिग बाजारमधील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, काही वेळानंतर आगीचे स्वरूप तीव्र झाले असून लेव्हल ४ ची आग असल्याचं एका अग्निशमन दलाच्या सूत्राने माहिती दिली. घटनास्थळी ५ फायर वाहन, ४ जम्बो वॉटर टँकर , १ क्यूआरटी  आणि 1 अँब्यूलन्स आहे. 

 

टॅग्स :आगबिग बाजारपुणे अग्निशामक दलपोलिस