Anil Deshmukh : मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:44 PM2022-05-27T17:44:16+5:302022-05-27T18:58:50+5:30

Anil Deshmukh Admitted in KEM Hospital :“अनिल देशमुख यांना केईएम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि छातीत दुखणे यासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Big news! Anil Deshmukh's chest began to ache, he was admitted to KEM's ICU | Anil Deshmukh : मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल

Anil Deshmukh : मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल

Next

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआय कोठडीत असून त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांचा रक्तदाब वाढला आहे. तसेच, त्यांची स्ट्रेस थिलियम हार्ट टेस्ट करायची असल्याने त्यांना मुंबईतील पर्ल येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना शुक्रवारी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांना केईएम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि छातीत दुखणे यासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या औषधोपचार आणि प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, ”असे रुग्णालयाच्या अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार, विशेष CBI कोर्टात अर्ज दाखल

सचिन वाझे माफीचा साक्षीदार 

मुंबईतील बार वसुलीप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळून वाझेने थेट ईडीकडेच माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली होती. याबाबत सचिन वाझेंनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

 

Web Title: Big news! Anil Deshmukh's chest began to ache, he was admitted to KEM's ICU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.