Join us

मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 5:00 PM

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांमध्ये घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आलाय. यासंदर्भातील शासन आदेशही काढण्यात आलाय. निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय.

२००० ते २०११ या कालावधीतील झोपडपट्टीधारकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे आता त्यांचं मुंबईतील घरांचं स्वप्न साकार होणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडीच्या संदर्भात त्या झोपडीत राहणाऱ्या झोपडीधारकांचं सशुल्क पुनर्वसन करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलंय. यासंदर्भात झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचं शुल्क निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती.

दरम्यान, गृहनिर्माण विभागाच्या १६ मे २०१८ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार  पात्र झोपडपट्टीधारकांना २.५ लाखांत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र