मोठी बातमी: शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर ईडीचे छापे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:15 PM2021-08-30T16:15:07+5:302021-08-30T16:26:52+5:30

ED raids Anil Parab's properties: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.

Big news: ED raids Shiv Sena leader, Transport Minister Anil Parab's properties | मोठी बातमी: शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर ईडीचे छापे 

मोठी बातमी: शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर ईडीचे छापे 

Next

मुंबई - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ( ED raids Shiv Sena leader, Transport Minister Anil Parab's properties)

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या तीन मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिग प्रकरणाशी असलेल्या संबंधांवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. दरम्यान, काल अनिल परब यांना ईडीने नोटिस पाठवल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तसेच या नोटिशीवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्याने अनिल परब वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर काल त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले होते. तसेच येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली होती. १०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले होते.   

दरम्यान, शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आजच छापे टाकले होते. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. 

 

Read in English

Web Title: Big news: ED raids Shiv Sena leader, Transport Minister Anil Parab's properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.