Join us

मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 7:58 AM

महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. 

Mumbai Rain ( Marathi News ) : मुंबई शहर आणि परिसरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांबाबत महापालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई शहरात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. 

पावसाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असाही उल्लेख महापालिकेच्या पत्रकात करण्यात आला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं असून नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहेत. तसंच या पावसाचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अतिमहत्त्वाचे काम असेल तरंच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबई महानगरपालिकाहवामानशाळामहाविद्यालय