मोठी बातमी: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:30 IST2025-02-22T13:29:24+5:302025-02-22T13:30:10+5:30

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Big news Massive fire breaks out in building in Marine Lines area south mumbai | मोठी बातमी: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मोठी बातमी: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai Fire News: दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद इथून जवळच असलेल्या एका इमारतीच्या आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेनं परिसरात मोठा गोंधळ उडाला. प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांकडून याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. सदर इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून या घटनेची नोंद करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Big news Massive fire breaks out in building in Marine Lines area south mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.