Join us  

मोठी बातमी! संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:08 PM

खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sanjay Raut ( Marathi News ) : 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना आता कोर्टाने १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला दाखल केला होता, या खटल्या प्रकरणी आता हा निकाल कोर्टाने दिला आहे. 

मेधा किरीट सोमय्या यांनी हा खटला खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केला होता. हा खटला माझगाव कोर्टात दाखल केला होता. राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा आरोप केले होते. या प्रकरणी गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू होती. दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला आहे. संजय राऊत यांना दोषी आढळल्याचे म्हटले आहे. 

या प्रकरणी संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.आयपीसी सेक्शन ५०० अंतर्गत ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आता आज हा निकाल कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांना दोषी सिद्ध करण्यात आले आहे. आता संजय राऊत या निर्णयाविरोधात पुढच्या कोर्टात जाऊ शकतात.  

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. माध्यमांसमोर केलेले वक्तव्य बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत. मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्याची विनंती केली. संजय राऊत यांच्यावर मानहानीची कारवाई करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेना