५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 03:57 PM2023-05-18T15:57:39+5:302023-05-18T15:58:53+5:30

वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचेही मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

Big relief to traffic police above 55 years of age Chief Minister eknath shinde gave important instructions vivek phansalkar | ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

googlenewsNext

दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास केला. यावेळी त्यांना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर एकनाथ शिंदे त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचनाही केली.

यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करण्यात येऊ नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणार आहे.

Web Title: Big relief to traffic police above 55 years of age Chief Minister eknath shinde gave important instructions vivek phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.