बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. या अगोदरच शिवसेनेचे १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किर्तीकर यांचे स्वागत केले." गजानन किर्तीकर यांच्यामुळे संघटनात्मक भार कमी होईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे. संघटनात्म बांधणी कशी बांधायची ती गजानन किर्तीकर यांना माहिती आहे. शिवसेना वाढीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला आनंद आहे ते आपल्याकडे आले आहेत. त्यांच्या कौशल्यामुळे संघटना बांधणीला मदत होणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
किर्तीकर यांनी आमच्याकडे येण्यासाठी कोणतीही अट घातली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची संघटना बलवान करण्यासाठी मला तुमच्याकडे यायचे आहे, असं मला किर्तीकर यांनी सांगितले, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मी आज स्वत:ला नशीबवान समजतो, मी केलेल्या उठावाची दखल जगाने घेतली. गजानन किर्तीकर आपल्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे. मुंबई कालही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आजही बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि उद्याही राहणार असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वडिल गजानन किर्तीकर शिंदेगटात पण मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. अगोदरच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदेंसोबत गेल्याने शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. मात्र, किर्तीकरांच्या या पक्षप्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. कारण, गजानन किर्तीकर यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असणार आहे.