Join us

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शिंदे गटाला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:39 PM

Maharashtra Political Crisis: पुण्यानंतर आता मुंबईत पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे समर्थन केले असून, एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत चालल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या अनेक दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोल करण्याचे काम शिवसेनेकडून सुरू झाले असले तरी, शिवसेनेतील पदाधिकारी, नेते, नगरसेवक यांचा शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. पुण्यानंतर आता मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर खिंडार पडायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वे  (Prakash Surve) यांच्या समर्थनार्थ मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख, तीन महिला शाखा संघटकांचे राजीनामे दिले आहेत. मुंबईत काही आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु आहेत. मुंबईत आता शिवसेनेला संघटनात्मक पातळीवरही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबईतूनही शिंदे गटाला पाठिंबा मिळण्यास सुरुवात

मुंबईत शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर कुणीही राजीनामे दिले नव्हते, परंतु आता बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मागाठाणेतील दोन शाखाप्रमुख आणि तीन महिला शाखा संघटकांचे पदाचे राजीनामा दिले आहेत. शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि महिला संघटक सुषमा पुजारी, शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामूणकर, शाखा क्रमांक २६ च्या महिला शाखा संघटक हेमलता नायडू, शाखा क्रमांक ५च्या महिला शाखा संघटक विद्या पोतदार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे मतदारसंघात परतले. यानंतर या ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या ठिकाणच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना राजीनामा देत सुर्वे यांचे समर्थन केले आहे. तत्पूर्वी, बंडखोर आमदार डोळ्यात डोळे घालू बोलू शकणार नाहीत, असे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. दोघांनीही हस्तांदोलन केले. दोघांची भेट आणि संभाषण कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र या संभाषणात प्रकाश सुर्वे काहीही बोलू शकले नाहीत. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळप्रकाश सुर्वेमागाठाणेशिवसेनाएकनाथ शिंदे