ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 04:02 PM2023-06-27T16:02:47+5:302023-06-27T16:03:58+5:30

Shiv Sena Thackeray Group BMC Morcha: आदित्य ठाकरे नेतृत्वात ०१ जुलै रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवनागी नाकारल्याचे सांगितले जात आहे.

big setback to shiv sena thackeray group police denied permission to morcha on bmc | ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

googlenewsNext

Shiv Sena Thackeray Group BMC Morcha: मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई करत अनेक ठिकाणी छापेमारी केली. मुंबई महापालिकेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातही ईडीच्या पथकांनी झाडाझडती घेतली. याविरोधाता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. ईडी कारवाईविरोधात ०१ जुलै रोजी विराट मोर्चा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा टीझरही जारी करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १ जुलैला शिवसेना ठाकरे गटाकडून विराट मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पण या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोर्चाची परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. 

मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी विनंती करण्याची शक्यता

पोलिसांकडून नाकारण्यात आलेली परवानगी ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ते विनंती करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. १ जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा  काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं होते.

दरम्यान, या महामोर्चाचा टीझर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला. मुंबई महापालिकेत रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओत भ्रष्टाचार कसा झाला आणि किती रक्कमेचा झाला याची माहिती दिली आहे. या व्हिडीओत मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाने राज्य सरकार आणि महानगर पालिकेवर केला. याची सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: big setback to shiv sena thackeray group police denied permission to morcha on bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.