बिग बाजारात सुट्टीत खरेदीची रेलचेल; हॉलिडे सेलद्वारे सवलतींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:28 AM2017-12-24T01:28:23+5:302017-12-24T01:28:40+5:30

ख्रिसमस व त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारमुळे सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण असून, आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘बिग बाजार’मध्ये पब्लिक हॉलिडे सेलद्वारे खरेदीची रेलचेल सुरू झाली आहे.

Big shopping in the holiday market; Rainy discounts by Holiday Sale | बिग बाजारात सुट्टीत खरेदीची रेलचेल; हॉलिडे सेलद्वारे सवलतींचा पाऊस

बिग बाजारात सुट्टीत खरेदीची रेलचेल; हॉलिडे सेलद्वारे सवलतींचा पाऊस

Next

मुंबई : ख्रिसमस व त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारमुळे सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण असून, आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘बिग बाजार’मध्ये पब्लिक हॉलिडे सेलद्वारे खरेदीची रेलचेल सुरू झाली आहे. विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत. सोमवार, २५ डिसेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.
बिग बाजार ही फ्युचर समूहाला देशातील सर्वांत मोठी हायपरमार्केट चेन आहे. बिग बाजारच्या देशभरातील २४०हून अधिक स्टोर्समध्ये सेल सुरू झाला आहे. या सेलचे वैशिष्ट्य म्हणजे, याद्वारे ग्राहकांसाठी पहिल्यांदाच विशेष क्रेडिट देण्यात आले आहे. फ्युचर पे वॉलेटमध्ये खरेदीआधीच १०१ रुपये जमा करण्यात आले आहेत.
ज्यांच्याकडे हे वॉलेट नाही ते ८०१०३५०००० या क्रमांकावर मिसकॉल देऊन या क्रेडिटचा वापर करू शकतील. या रकमेचा वापर ग्राहक २५ डिसेंबरपर्यंत चालणाºया सेलमध्ये करू शकतील. याव्यतिरिक्त स्टेट बँकेचे कार्ड वापरणाºयांना ३५०० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीवर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे.
हा धमाकेदार सेल कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी असेल. पुरुष, महिला व लहान मुलांसाठीच्या फॅशनेबल कपड्यांच्या खरेदीवर ५० टक्के सूट असेल. सफोला गोल्ड तेलाचा ७५० रुपयांचा डबा ७१५ रुपयांत मिळेल.
शिवाय एक लीटर तेलाचे पाकीट मोफत असेल. बेडशीट्स, ब्लँकेट्सच्या खरेदीवर ३० टक्के, स्काय बॅग्ज, सफारी, अ‍ॅरिस्टोक्रॅट आदी लगेज बॅग्ज तसेच ट्रॉलीज्वरही ६० टक्के सवलत आहे.
भारतीयांचा एखादा महत्त्वाचा सण असला की बिग बाजार तो जल्लोषात साजरा करण्यासाठी
कायम ग्राहकांना सामावून घेतअसतो.
त्यातीलच पब्लिक हॉलिडे सेल हा बिग बाजारच्या बहुप्रतीक्षित खरेदी दिवसांपैकी एक आहे. ग्राहकांची सुट्टी अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो, असे बिग बाजारचे सीईओ सदाशिक नायक यांनी सांगितले.

Web Title: Big shopping in the holiday market; Rainy discounts by Holiday Sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई