श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 01:20 PM2022-11-19T13:20:15+5:302022-11-19T13:20:54+5:30

Mangal Prabhat Lodha: आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे.

Big step of state government after Shraddha Walker murder case; An important suggestion was made regarding the current status of inter-faith married girls | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना

Next

मुंबई - लिव्ह इन पार्टनरकडून झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे.

याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, काल महिला आयोगाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाबाबत चर्चा झाली.  श्रध्दा वालकरप्रमाणेच इतरही अनेक प्रकरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्या मुलींचे आपल्या परिवारासोबत संबंध तुटत आहेत. त्यांच्यासाठी महिला आयोगाने पुढे येऊन अश्या मुलींचा शोध घेतला पाहिजे. त्यांची काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतला पाहिजे. तसेच या मुलींना माहिला आयोग काय मदत करु शकते याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आदेश मी दिले आहेत.

आंतरधर्मीय विवाह झालेल्यांची सध्याची परिस्थिती काय आहे. संबंधित मुली - महिला सुखरूप आहेत ना याबद्दल माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापण करा. अशी अनेक प्रकरण महाराष्ट्रात असू शकतात त्याचा शोध घ्यावा. संबंधित मुली किंवा महिला अडचणीत असतील तर त्यांना शक्य ती सर्व मदत करणार, असेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

Read in English

Web Title: Big step of state government after Shraddha Walker murder case; An important suggestion was made regarding the current status of inter-faith married girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.