Join us

Video : मोठी दुर्घटना टळली! सायन-पनवेल हायवेवर मेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:50 PM

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

ठळक मुद्देसायन - पनवेल हायवेवर डायमंड गार्डन या ठिकाणी हा सांगाडा आज दुपारी 12 वाजण्याच्यासुमारास कोसळला. विष्यात अशा दुर्घटना होऊ नये याची दक्षता मेट्रो प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे नागरिकाचं म्हणणं आहे. 

बई - सायन - पनवेल हायवेवर सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

मुंबईत ठिकठकाणी मेट्रोची जोरदार काम सुरू आहेत. मुंबई मेट्रो 2 बीचे काम सुरू आहे. पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. सायन - पनवेल हायवेवर डायमंड गार्डन या ठिकाणी हा सांगाडा आज दुपारी 12 वाजण्याच्यासुमारास कोसळला. दरम्यान या रस्त्यावरून रोज हजारोच्या संख्येत वाहने जात असतात. मात्र, ज्या वेळी हा सांगाडा जास्त हलत होता आणि एकीकडे झुकला दिसत होता. हे पाहून त्यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केला आणि वाहन थांबवली. त्यामुळे होणारा मोठा अपघात टळला. मात्र, या अगोदर देखील मुंबईत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. बांधकाम सुरू असताना सुरक्षेची आवश्यकता असलेली दक्षता घेतली जात नाही हे स्पष्ट होत आहे. सांगडा कोसळताना त्याच्या मागे दोन बस होत्या. मात्र सुदैवाने काही क्षणाच्या फरकान मोठा अपघात टळला आहे. मात्र भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये याची दक्षता मेट्रो प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे नागरिकाचं म्हणणं आहे. 

टॅग्स :मेट्रोवाहतूक कोंडीरस्ते वाहतूक