सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 06:16 IST2025-02-01T06:15:51+5:302025-02-01T06:16:13+5:30

पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.

Big update in the attack case on Saif Ali Khan | सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल समोर

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) याचा चेहरा ओळख (फेस रेकग्निशन) अहवाल सकारात्मक आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेला आरोपी आणि हल्लेखोर एकच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

शरीफुल हा हल्ला करून पसार झाल्यावर २.३३ मिनिटांनी त्याचा चेहरा तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. या चेहऱ्याचा फोटो घटनेच्या दिवशी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या आरोपीच्या प्रतिमांशी जुळतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सैफ राहत असलेल्या वांद्रे पश्चिमेतील सतगुरु शरण इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत हल्लेखोराचा चेहरा आणि आरोपी हा वेगळा असल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.

आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत
पोलिसांना न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा (एफएसएल) अहवाल शुक्रवारी प्राप्त केला. त्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचा फोटो आणि विविध सीसीटीव्ही फुटेजमधील हल्लेखोराची छायाचित्रे एकाच व्यक्तीची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शरीफुलची २९ जानेवारी रोजी पोलिस कोठडी संपली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सीसीटीव्हींची पडताळणी
पोलिसांनी जवळपास ४६० सीसीटीव्ही फुटेजची यासाठी पडताळणी केल्याची माहिती आहे. शरीफुलच्या हाताच्या ठशाचे नमुने आणि घटनास्थळावरील हल्लेखोराच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याच्या आरोपावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे फेस रेकग्निशन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. शरीफुलचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे अन्यही तांत्रिक पुरावे आहेत. यात सीसीटीव्ही फुटेज (जे मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेले नाही), मोबाईल लोकेशन आणि आयपीडीआर (इंटरनेट प्रोटोकॉल तपशील अहवाल) यांचा समावेश आहे.

Web Title: Big update in the attack case on Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.