Join us

"बिग बॉस" हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 3:03 PM

गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याबद्दल बोलताना रश्मिका मंदानाचं सौंदर्यही माझ्या आजीपुढे फिके पडेल, असे म्हटले होते.

मुंबई - वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी होऊन आपली स्वत:च वेगळं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण केलंय. आपण कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या पाठिशी असलेला वकील असून डॉ. बाबासाहेबांचं संविधान हेच सर्वोत्कृष्ट मानतो, असेही ते नेहमी बोलतात. नेहमीच कायद्याची भाषा आणि ओरडून बोलण्याच्या व वेगळ्याच स्टाईलमुळेही ते माध्यमांत नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला बिग बॉस हिंदीची ऑफर होती, असे सांगितले. 

गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याबद्दल बोलताना रश्मिका मंदानाचं सौंदर्यही माझ्या आजीपुढे फिके पडेल, असे म्हटले होते. सदावर्तेचं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. त्यातच, याच मुलाखतीत त्यांनी बिग बॉस हिंदीकडून ऑफर आल्याचा खुलासा केला. तुमच्यावर आधारित एक चित्रपट आला तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न सदावर्ते यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना, सदावर्ते म्हणाले,  "बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे दोन महिने लोकं फेऱ्या घालत होते. त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर दोन महिने अॅग्रीमेंट घेऊन फेऱ्या घालत होता, अशी माहितीच त्यांनी दिली. तसेच, जेनला खतरों के खिलाडी हिंदीसाठी विचारण्यात आले होते. त्या लोकांनी सहा महिने वाट पाहिली. आमचं जीवन हे खूप व्यस्त आहे. फिल्मी जीवनासाठी आमचा जन्म झालेला नाही. गरजवंतांना मदत करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे.", असेही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, बिग बॉस हिंदी आणि बिग बॉस मराठीमध्ये नेहमीच सोशल मीडियावर इन्फ्लुन्सिव्ह असलेल्यांना प्राधान्याने बिग बॉसच्या घरात संधी दिली जाते. यापूर्वी बिग बॉस हिंदीत अभिजीत बिचुकले यांना संधी मिळाल होती. त्यावेळी, सर्वाधिक गोंधळ घालणारं व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांचीही सोशल मीडियावर चर्चा होत होती. विशेष म्हणजे अभिजीत बिचुकले यांना एका प्रकरणात बिग बॉसच्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे, दे चांगलेच चर्चेत आले होते.   

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेबिग बॉस