माटुंग्याच्या हारवाला गल्लीतील मोठ्या हारांना सर्वाधिक मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:54 AM2018-09-06T05:54:49+5:302018-09-06T05:55:20+5:30

गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूतीर्चं आगमनही व्हायला सुरवात झाली आहे.

 The biggest demand for big necklaces in the lane of Matunga | माटुंग्याच्या हारवाला गल्लीतील मोठ्या हारांना सर्वाधिक मागणी

माटुंग्याच्या हारवाला गल्लीतील मोठ्या हारांना सर्वाधिक मागणी

googlenewsNext

मुंबई : गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूतीर्चं आगमनही व्हायला सुरवात झाली आहे. मंडपाच्या सजावटीबरोबच गणेशोत्सवात महत्वाची असते ती बाप्पाच्या मूर्तीसमोरील सजावट आणि बाप्पाला दररोज लागणारा भलामोठा फुलांचा हार. हे भलेमोठे हार मिळण्याचं मुंबईतलं ठिकाण म्हणजे माटुंगा स्टेशनजवळील हारगल्ली. मुंबईतील जवळपास सर्व छोटी-मोठी गणेशोत्सव मंडळं गणपतीच्या १० दिवसात माटुंग्याच्या या हारगल्लीतून दररोज हा भलामोठा हार मागवतात. आणि या हाराची किंमतही असते १००० रूपये.
हे मोठे हार बनवण्याची लगबग गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. गणेशप्रतिष्ठापनेच्या पूजेच्या दिवशी भल्या पहाटे मंडळाचे कार्यकर्ते हे भलेमोठे हार घेण्यासाठी माटुंग्याच्या हार गल्लीत गर्दी करतात. गणेशोत्सव म्हटला की जास्वंदी, गुलछडी, लीली, चाफा, गुलाब, झेंडू, मोगरा आदी फुलांना तेजीचे दिवस येतात. अश्या वेगवेगळ््या प्रकारची फुलं वापरून हे मोठे हार तयार करत असल्याने माटुंग्याच्या हारगल्लीत या हारांना मुंबईतील मंडळांकडून सवार्धिक मागणी असते. इथे हार तयार करण्यासाठी वापरली जाणारी फुलं ही ताजी आणि उत्तम प्रकारची वापरली जात असल्याने मंडळाचा हेच हार घेण्याकडे कल असतो.

Web Title:  The biggest demand for big necklaces in the lane of Matunga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.