Join us

‘बीजायन मिशन’ २०२३ मध्ये अपेक्षित खर्च १० लाख डॉलर

By admin | Published: July 03, 2017 4:33 AM

‘इंडियन अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजी रीसर्च फौंडेशन’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने शुक्र ग्रहाच्या वातावरणात सजीवसृष्टीचे बीजारोपण करण्यासाठी

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘इंडियन अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजी रीसर्च फौंडेशन’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने शुक्र ग्रहाच्या वातावरणात सजीवसृष्टीचे बीजारोपण करण्यासाठी  आखलेल्या ‘बीजायन मिशन’चे यान सन २०२३ मध्ये सोडले जाईल वत्यासाठी जास्तीत जास्त १० लाख अमेरिकी डॉलर एवढा खर्च अपेक्षित आहे. या निमित्ताने फौंडेशनचे संचालक व मिशनचे मुख्य वैज्ञानिक पुष्कर गणेश वैद्य यांच्याशी ‘लोकमत’ने ई-मेलव्दारे केलेल्या संवादाचा गोषवारा असा-प्रश्न-तुमच्या प्रस्तावित यानाला शुक्रापर्यंत पोहोचायला किती काळ लागेल?वैद्य- साधारणपणे १५० दिवस. नक्की वेळ कोणती कक्षा निवडू त्यावर ठरेल.प्रश्न- शुक्राच्या वातावरणात हे सुक्ष्मजिवाणू किती अंतरावरून फवारले जातील?वैद्य- शुक्राच्या ‘हिल स्पियर’मध्ये पाच ते १० लाख किमी अंतरावरून.प्रश्न- यासाठी लागणारे विशिष्ठ प्रकारचे सुक्ष्मजिवाणू कुठून आणणार? ते सहज उपलब्ध आहेत की प्रयोगशाळेत मुद्दाम तयार करावे लागतील?वैद्य- हे जिवाणू मानवाला रोगराईची लागण न करणारे असल्याने ते प्रयोगशाळांमधून विकत घेण्यात काही अडचण नाही. शिवाय निसर्गातूनही ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतात.प्रश्न- अशा प्रकारचे खासगी अंतराळ मिशन व संशोधन करायला भारतात कायद्याची आडकाठी आहे की कसे?वैद्य- ग्रहताऱ्यांच्या शोधासाठी प्रयोग करण्यास कायदेशीर प्र्रतिबंध नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कायदा नसला तरी पृथ्वीवरील सुक्ष्मजिवांनी अन्य ग्रह प्रदूषित न करण्यासंबंधीची मार्गदर्शिकाआहे. त्यातही शुक्र हा मंगळाच्या तुलनेत खालच्या आणि वेगळ््या वर्गात असल्यानेत्याच्या बाबतीत फारशी कडक बंधने नाहीत.प्रश्न- शुक्राचे वातावरण अशा बीजारोपणाने मानवी वस्तीसाठी अनुकूल होईपर्यंत किती काळ लागेल? तोपर्यंत इकडे पृथ्वीचेकाय झालेले असेल? या संभाव्य ‘सेकंड होम’मध्ये जायला पृथ्वीवर मानवी वंश शिल्लक राहिलेला असेल का?वैद्य- आपण पृथ्वीवासी राहिलो नाही तराही सजीवसृष्टी सजीवसृष्टी तग धरून राहावी, हाच तर या मिशनचा हेतू आहे. काही हजार किंवा दहाच्या पटीत काही हजार वर्षात शुक्राचे अनुकूलन व्हावे, अशी अपेक्षा आहे.तोपर्यंत आपण पृथ्वीवर नक्कीच असू.