दुचाकी आवाज करत होती, म्हणून पेट्रोल काढून फेकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:08 AM2021-08-24T04:08:58+5:302021-08-24T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ''माझी दुचाकी आवाज करत होती, पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने तसे होत आहे, असे वाटल्याने मी ...

The bike was making noise, so the petrol was thrown away! | दुचाकी आवाज करत होती, म्हणून पेट्रोल काढून फेकले !

दुचाकी आवाज करत होती, म्हणून पेट्रोल काढून फेकले !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ''माझी दुचाकी आवाज करत होती, पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने तसे होत आहे, असे वाटल्याने मी त्यातील अगदी थोडे राहिलेले पेट्रोल बाटलीत भरून ती सहज भिरकावली, जी विमानतळाच्या सीमाभिंतीवर पडली,'' अशी कबुली गणेश पालेकर (२९) या विद्यार्थ्यांने वाकोला पोलिसांकडे दिली. त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

सांताक्रुझ पूर्व येथील झोपडपट्टीजवळच असलेल्या विमानतळाच्या सीमाभिंतीवर पेट्रोल भरलेली बाटली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना सापडली होती. विमानतळ सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी याप्रकरणी वाकोला पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आरोपी हा विद्यार्थी आहे, बेरोजगार आहे. त्याची पूर्ण चौकशी आम्ही केली आहे. ज्यात त्याने ही बाटली घातपाताच्या उद्देशाने नव्हे, तर सहजच फेकल्याचे उघड झाले असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले.

सीआयएसएफच्या तक्रारीनुसार वाकोला पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३३६ (जीव किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. धावपट्टीनजीक काही तरी पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीआयएसफ जवानांनी तात्काळ त्यादिशेने धाव घेतली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. बाटलीतील पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथकाला पाचारण केले. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने नीट तपासणी केल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने बाटली जप्त केली होती.

Web Title: The bike was making noise, so the petrol was thrown away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.