बाइकस्वाराची ९ विद्यार्थ्यांना धडक

By Admin | Published: October 6, 2015 02:53 AM2015-10-06T02:53:14+5:302015-10-06T02:53:14+5:30

मसीहा शाळेत जाणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून

BikeSharva hit 9 students | बाइकस्वाराची ९ विद्यार्थ्यांना धडक

बाइकस्वाराची ९ विद्यार्थ्यांना धडक

googlenewsNext

अंबरनाथ : मसीहा शाळेत जाणाऱ्या ९ विद्यार्थ्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, ५ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कल्याण-बदलापूर महामार्गावर ील शाळेत सकाळी पावणेसात वाजता विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळ असताना अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अरमान खान या दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात ९ विद्यार्थी झाले. ५ विद्यार्थ्यांवर उपचार करून लागलीच सोडण्यात आले. उर्वरित चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यातील सूरज तिवारी या विद्यार्थ्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लागलीच कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर, ध्रुवी कुंभार, साक्षी सिंह आणि पूजा सिंह यांच्या पायाला गंभीर दुखापत असून, त्यांच्यावर अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. दुचाकीस्वार अरमानही गंभीर जखमी झाला. अरमान अल्पवयीन असून, त्याच्याविरोधात बेजबाबदारपणे गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

घरच्यांच्या नकळत दामटली गाडी
मसीहा शाळा ही कल्याण-बदलापूर महामार्गाला लागूनच असून येथे शेकडो विद्यार्थ्यांची
ये-जा असते. मात्र शाळा रस्त्याला लागून असतानाही या ठिकाणी गतिरोधक नाही.
या अपघातास कारणीभूत असलेला अरमान खान हा अल्पवयीन असून त्याला गाडी न चालविण्याचा सल्ला त्याच्या पालकांनी दिला होता. सोमवारी अरमान याने घरात ठेवलेली आपल्या मोठ्या भावाच्या गाडीची चावी घेतली आणि घरात
न सांगताच निघून गेला.

Web Title: BikeSharva hit 9 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.