४० दिवसांत बाइकवरून भारतभ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 01:51 AM2016-05-13T01:51:50+5:302016-05-13T01:51:50+5:30
४० दिवसांत तब्बल २१ हजार किलोमीटरचे अंतर कापण्याची किमया तिघा तरु णांनी साध्य केली आहे. या प्रवासात त्यांनी देशातील सर्व राज्यांची भ्रमंती केली आहे.
अंबरनाथ : ४० दिवसांत तब्बल २१ हजार किलोमीटरचे अंतर कापण्याची किमया तिघा तरु णांनी साध्य केली आहे. या प्रवासात त्यांनी देशातील सर्व राज्यांची भ्रमंती केली आहे.
कल्याणमधील प्रेम पांडे, बदलापुरातील अनिकेत गुरव आणि सुरत येथील वत्सल जोगानी या तिघा तरु णांनी आपला प्रवास २८ मार्च रोजी गुजरातमधून सुरू केला. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, आसाम, अरु णाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा मेघालय, भुतान, नेपाळचा प्रवास पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पुन्हा गुजरात असा प्रवास केला. दररोज ७०० ते ८०० किमीचे अंतर ते कापत होते. मात्र, अतिदुर्गम भागात हाच प्रवास २०० ते ३०० किमीचा होत होता. या प्रवासात त्यांना चीनच्या सीमेवर असताना बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागला. वजा १० अंश तापमानात या तरु णांना येथील कुपुक या गावातील ग्रामस्थांनी आसरा दिला. त्यामुळे त्यांच्यावरील संकट शमले. (प्रतिनिधी)