बिल्कीस बानो केस; मध्यस्थी अर्ज फेटाळला

By admin | Published: November 17, 2016 06:48 AM2016-11-17T06:48:31+5:302016-11-17T06:48:31+5:30

२००२ मधील गोध्रा हत्याकांडानंतर सामुहिक बलात्कार करण्यात आलेल्या बिल्कीस बानोचा मध्यस्थी अर्ज मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळला.

Bilkeis Bano case; The intervention application rejected | बिल्कीस बानो केस; मध्यस्थी अर्ज फेटाळला

बिल्कीस बानो केस; मध्यस्थी अर्ज फेटाळला

Next

मुंबई: २००२ मधील गोध्रा हत्याकांडानंतर सामुहिक बलात्कार करण्यात आलेल्या बिल्कीस बानोचा मध्यस्थी अर्ज मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. गोध्रा हत्याकाडानंतर बिल्कीसच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली.
सत्र न्यायालयाने २००८ मध्ये सामुहिक बलात्कार व हत्येप्रकरणी ११ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध ११ जण उच्च न्यायालयात अपिलात गेले तर ता सर्वांची शिक्षा वाढवण्यात यावी, यासाठी सीबीआयनेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. के. ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती.
सीबीआयच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत बानोनेही या अपिलांवरील सुनावणीदरम्यान आपलीही बाजू ऐकून घ्यावी, यासाठी बिल्कीस बानोने उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला. मात्र खंडपीठाने हा अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला.
अपिलामध्ये पीडितेची बाजू ऐकण्याची तरतूद कायद्यात नाही, असे खंडपीठाने बानोचा अर्ज फेटाळताना म्हटले. (प्रतिनिधी)

Web Title: Bilkeis Bano case; The intervention application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.