Join us

एकाच कामाचे दोन वेळा बिल

By admin | Published: June 25, 2014 11:13 PM

एकीकडे पालिकेची तिजोरी रिती झाली असताना आता पालिकेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

ठाणो : एकीकडे पालिकेची तिजोरी रिती झाली असताना आता पालिकेचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. एकाच ठिकाणी दोनदा काम करून पुन्हा त्याच कामाचे ठेकेदाराला बिल अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमध्ये उघडकीस आला आहे. एकदा भुयारी गटार बांधल्यानंतर किमान 2क् वर्षे त्याचे आयुर्मान असताना 1क् वर्षात पुन्हा त्याच ठिकाणी हे काम पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत  संपूर्ण ठाणो शहरामध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली असून त्यासाठी 53.6क् कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टप्पा क्र . 1 मध्ये पंपिंग स्टेशन क्र मांक 1, 2, 6, 7 अंतर्गत ड्रेनेज आणि मेनहोल बांधण्यात आले आहे. यामध्ये पंपिंग स्टेशन  क्रमांक 6 अंतर्गत वृंदावन सोसायटीचा भाग येत असून या ठिकाणी 2क्11 मध्ये भुयारी गटार बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र हेच काम 2क्क्क् सालात करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी माहितीच्या अधिकारात उजेडात आणली आहे. 
मे. सोनू अँड असोसिएट या कंपनीने हे काम केले असून त्यासाठी 25.16 लाख इतका खर्चदेखील करण्यात आला आहे. संपूर्ण ठाणो शहरामध्ये भुयारी गटार योजना राबवण्याचे काम हाती घेण्यात आले. तेव्हा वृंदावन परिसरामध्ये 2क्क्क् सालीच काम झाल्याने तेवढा भाग सोडून काम करणो अपेक्षित होते. 
तसे न करता या भागामध्ये पुन्हा काम करण्यात आले असून पुन्हा एकदा ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. 2क्क्क् साली झालेल्या कामांमध्ये त्रुटी होत्या तर त्या वेळी ठेकेदाराला बिल कोणत्या आधारावर अदा करण्यात आले आहे आणि जर त्रुटी नसतील तर पुन्हा बांधकाम करून लाखो रु पयांचा खर्च करण्याची काय आवश्यकता होती. तसेच 2क्क्क् साली बांधण्यात आलेल्या मलवाहिन्यांचे ड्राव्हिंग आणि डिझाइन 2क्क्क् साली बांधण्यात आलेल्या मलवाहिन्यांशी मिळतेजुळते कसे, असे अनेक प्रश्न या बांधकामाबाबत निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)
 
च्2क्क्क् साली झालेल्या कामांमध्ये त्रुटी होत्या तर त्या वेळी ठेकेदाराला बिल कोणत्या आधारावर अदा करण्यात आले आहे. त्रुटी नसतील तर पुन्हा बांधकाम करून लाखो रु पयांचा खर्च करण्याची गरज का होती.
च् मलवाहिन्यांचे ड्राव्हिंग, डिझाइन 2क्क्क् साली बांधलेल्या मलवाहिन्यांशी मिळतेजुळते कसे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
पालिकेच्या ड्रेनेज  पंपिंग क्र मांक 6 करिता श्रीरंग सोसायटीच्या मालकीची नाल्यालगतची जागा ताब्यात घेताना ठाणो महापालिका, तत्कालीन वॉटर सप्लाय अँड सुवरेज बोर्ड आणि श्रीरंग सोसायटी यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. या करारामध्ये सोसायटीच्या मालकीची जागा पंपिंग स्टेशनला देण्याच्या बदल्यात श्रीरंग आणि राबोडी परिसरातील (ज्यामध्ये वृंदावन सोसायटीचा समावेश होतो)  सर्व गटारे पालिकेच्या वतीने बांधण्यात येतील, असे नमूद करण्यात आले होते.
 
मात्र 2क्क्क् साली जेव्हा बांधकाम करण्यात आले तेव्हा सदरचा परिसर खासगी असून वृंदावन सोसायटीमधील प्रत्येक रहिवाशाकडून 45क् रु पये असे  12 लाख 72  हजार 15क्  रुपये घेण्यात आले. करारानुसार  ही कामे पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे कबूल करण्यात आले असताना रहिवाशांकडून हा खर्च वसूल केल्याने ही रहिवाशांची फसवणूक असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे.