जैवविविधता धोक्यात

By Admin | Published: May 22, 2015 12:42 AM2015-05-22T00:42:40+5:302015-05-22T00:42:40+5:30

सध्या राज्यातील प्रत्येक शहरातील तलावांचे सुशोभीकरण - सौंदर्यीकरणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाती घेतलेली दिसतात.

Biodiversity hazard | जैवविविधता धोक्यात

जैवविविधता धोक्यात

googlenewsNext

संकेत सातोपे - मुंबई
सध्या राज्यातील प्रत्येक शहरातील तलावांचे सुशोभीकरण - सौंदर्यीकरणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाती घेतलेली दिसतात. परंतु, हे सुशोभीकरण करताना आवश्यक काळजी घेण्यात येत नसल्यामुळे तलावांसभोवतालच्या जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, असे मत ठाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. आर.पी. आठल्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
तलावांशेजारी असणाऱ्या पाणथळ जमिनीमध्ये अनेक प्रकारचे कीटक, गांडूळ-खुबे-शिंपले यांसारखे जीव, लव्हाळे-शिंगाडे-कमळे-हायड्रील आदी वनस्पती आढळतात. परंतु, सुशोभीकरण करताना या जैवविविधतेचा विचारच न करता, सरसकट काँक्रिटीकरण केले जाते. त्यामुळे येथील पाणथळ जमीन नाहीशी होऊन ही जीवसंपदा नष्ट
होते.
एकीकडे सुशोभीकरणासारख्या कामांमुळे तलावांवरील अतिक्रमणांना आणि अस्वच्छतेला आळा बसतो, हे खरे असले, तरीही त्यात जीवसृष्टीचीही हानी होत आहे. सुशोभीकरण करताना योग्य काळजी घेण्यात आली, तर यात सुवर्णमध्य साधता येईल, असेही आठल्ये म्हणाले.
ठाणे खाडीच्या सुशोभीकरणात अशा प्रकारे जीवसृष्टीची हानी होऊ नये यासाठी ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या माध्यमातून जनजागृती करणारे प्रा. विद्याधर वालावलकर यांनीही लोकमतशी बोलताना याच मुद्द्यांवर भर दिला. ठाणे खाडीत प्राणी-पक्षी-वनस्पतींची मोठी जैवविविधता आढळते. परंतु, केमिकल प्रदूषण, गटारांचे सांडपाणी, घनकचरा टाकल्यामुळे खारफुटीचे होणारे नुकसान आदीमुळे त्याचे मोठे नुकसान होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच हा प्रश्न सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच एक मोठा उपक्रम हाती घेणार असल्याचेही वालावलकर म्हणाले.

च्तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ््या जातीचे जीव आढळतात. या जीवांमुळेच तलावाची एक परिसंस्था निर्माण झालेली असते.

च्पर्यटन तसेच मनोरंजनासाठी शहरांमधील तलावांचे सुशोभीकरण केले जाते, मात्र या सुशोभीकरणामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये काँक्रीटीकरण केले जाते. अशा काँक्रीटीकरणामुळे जैवविविधता धोक्यात येऊ शकते.

च्खाडी आणि तलावांमध्ये सोडल्या जाणाऱ्या प्रदुषित पाण्यामुळेही या जैवविविधतेला धोक्यात येते. त्यामुळे घनकचरा, प्रदुषित पाणी, प्लास्टीक या पाण्यामध्ये न टाकणेच उत्तम.

Web Title: Biodiversity hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.