‘बीएनएचएस’तर्फे जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम

By Admin | Published: May 5, 2017 06:33 AM2017-05-05T06:33:19+5:302017-05-05T06:34:03+5:30

बीएनएचएसतर्फे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील एक अभ्यासक्रम ‘जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम’

Biodiversity promotion course by BNHS | ‘बीएनएचएस’तर्फे जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम

‘बीएनएचएस’तर्फे जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम

googlenewsNext

मुंबई : बीएनएचएसतर्फे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील एक अभ्यासक्रम ‘जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम’ हा आता सुरू करण्यात येणार असून, या अभ्यासक्रमासाठी नोंदणीची
अंतिम तारीख १५ मे आहे.
परिसरात वृक्षतोड होत आहे, तलाव बुजवले जाऊन त्यावर घरे बांधली जात आहेत, लहान मुलांना निसर्गाविषयीची हवी तितकी माहिती देण्यासाठी आवश्यक असणारी जंगले नष्ट होत आहेत. या निसर्गातील मानवी अतिक्रमणांबद्दल काहीतरी करावेसे वाटते; परंतु एक सामान्य माणूस याविषयी काय करू शकतो हे कळत नाही.
तुमच्या मनातही अशा शंका उपस्थित होत असतील आणि त्यावर उपाय जाणून घ्यायचा
असेल, तर बीएनएचएस संवर्धन शिक्षण केंद्र (सीईसी), मुंबईतर्फे राबवला जाणारा ‘जैवविविधता संवर्धन अभ्यासक्रम’ आता तुम्हाला मदत करणार आहे. (प्रतिनिधी)

पात्रता : जैवविविधता आणि पर्यावरणाची आवड असलेले  सर्व जण या अभ्यासक्रमास पात्र असतील. सहभागी होणाऱ्यांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. संगणक व इंटरनेट वापरता येणे  आवश्यक आहे.


अभ्यासक्रमात जैवविविधता, परिसंस्था, निसर्ग संवर्धन, सस्तन प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सागरी जीव अशा विषयांवरील माहिती दिली जाईल.

सोप्या भाषेत लिहिलेल्या या माहिती व चित्रांच्या आधारे अभ्यासकाने दर महिन्याला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या अभ्यासक्रमांतर्गत निसर्गभ्रमंतीही आयोजित करण्यात येईल. विषयातील तज्ज्ञाशी आॅनलाइन गप्पा मारता येतील.

दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अडकलेल्या सर्व निसर्गप्रेमींसाठी व आपल्यातील नेतृत्वाचा वापर करून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्यांसाठीच्या  या अभ्यासक्रमाचा कालावधी  १२ महिन्यांचा आहे.

भारताची जैवविविधता, नैसर्गिक अधिवास, संवर्धन समस्या व शाश्वत जीवनशैलीबाबत उपयुक्त माहिती मिळवणे.


बीएनएचएस तसेच  इतर संस्थांमधील तज्ज्ञ  व शास्त्रज्ञांना भेटण्याची  व संवाद साधण्याची  संधी.


आपल्या परिसरातील जैवविविधता व निसर्गाची शास्त्रीय पद्धतीने नोंदणी करण्याची संधी.

विषयात संशोधन कसे करावे याचे मार्गदर्शन. त्याचप्रमाणे बीएनएचएस (सीईसी)मध्ये मार्गदर्शक म्हणून सहभागी
होऊ शकता.

आपल्या कार्यक्षेत्रात शाश्वत पद्धतीवर आधारित बदल घडवून निसर्ग संवर्धन करण्याची संधी.

अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर बीएनएचएसतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.

Web Title: Biodiversity promotion course by BNHS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.