पनवेल : कामोठे वसाहतीत मोकळ्या भूखंडावर टाकण्यात आलेले बायोमेडिकल वेस्ट बुधवारी सिडकोने उचलले. लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त करीत लोकमतचे आभार मानले.सिडको वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीकडे देणे बंधनकारक सिडकोे वसाहतीतील रुग्णालयांकडून कामोठेतील मोकळ्या भूखंडांवर सर्रास बायोमेडिकल वेस्ट टाकले जात होते. यामुळे मानसरोवर पंपिंग हाऊसच्या बाजूला सेक्टर-२४ येथे बायोमेडिकल वेस्टचे जणू डंम्पिंग ग्राउंड झाले होते. या प्रश्नाला लोकमतने वाचा फोडल्यानंतर सिडको प्रशासनाला जाग आली. बुधवारी या ठिकाणी टाकण्यात आलेले बायोमेडिकल वेस्ट तातडीने उचलण्यात आले.लोकमत वृत्ताचे स्वागतरुग्णालये मोकळ्या जागेत बायोमेडिकल वेस्ट टाकतात. लोकमतने सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे मांडल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
बायोमेडिकल वेस्ट सिडकोने अखेर उचलले
By admin | Published: September 11, 2014 12:47 AM