धान्य वाटपासाठी बायोमेट्रीक!
By admin | Published: April 28, 2015 10:49 PM2015-04-28T22:49:26+5:302015-04-28T22:49:26+5:30
शिधावाटप दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह आणि विविध वस्तूंचा होणारा काळाबाजार कायमचा थांबवण्यासाठी दुकानांवर ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ वर्षभरात राज्यभर राबवण्यात येणार आहे.
सुरेश लोखंडे ल्ल ठाणे
शिधावाटप दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह आणि विविध वस्तूंचा होणारा काळाबाजार कायमचा थांबवण्यासाठी दुकानांवर ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ वर्षभरात राज्यभर राबवण्यात येणार आहे. तिचा शुभारंभ ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणार आहे. त्यासाठी यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली आहे.
रेशन दुकानांवर केंद्र व राज्य शासनाव्दारे शिधापत्रिका धारकाच्या नावे जीवनावश्यक विविध स्वरूपाचे अन्नधान्य, खाद्यतेल, रॉकेल, गहू, तांदूळ, साखर आदी साहित्य स्वस्तात दिले जाते. आतापर्यंत दुकानदारांच्या नोंदीवर भरवसा ठेऊन हजारो टन अन्नधान्याचा पुरवठा दरमहा शिधापत्रिकाधारकाना होत असल्याचे ग्राह्य धरले जाते आहे. पण काही सोडले तर बहुतांशी शिधापत्रिकाधारक या वस्तूंपासून अद्यापही वंचित आहेत. पण लवकरच संबंधीत कार्डधारकाना दुकानात जाऊन प्रत्यक्ष बोटाचे ठसे ‘बायोमेट्रीक’ युनिटवर पडताळून पाहिल्यानंतरच त्यांना या अन्नधान्यासह साखर, रॉकेलचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय गॅस सिलिंडरही याच पध्दतीने ग्राहकास मिळणार असल्यामुळे धान्यदुकानदार व गॅस पुरवठा एजन्सीचे धाबे दणाणले आहे.
यासाठी दोन टप्पांमध्ये कामाचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्यात संपूर्ण शिधापत्रिकांची संगणकीय नोंद केली जात आहे. भारत सरकारचे खाद्यनिगम विभाग ते तालुकास्तरावर होणाऱ्या धान्यवाहतुकीचे संगणकीकरण, पुरवठा विभागाची विविध कार्यालये व पातळ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहेत. तर दुसऱ्या टप्यात एफपीएस अॅटोमेशनचे काम होणार आहे. यामध्ये प्रत्येक शिधावाटप दुकानावर बायोमेट्रीक यंत्र बसवण्यात येणार आहे.
यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सुमारे ५५४ शिधावाटप धान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यावरील सुमारे एक लाख ९५ हजार कार्ड धारकांपैकी ९० टक्के ग्राहकांच्या शिधापत्रिका तपासण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहेत.
याशिवाय शिधापत्रिका धारकाचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर आदींचे फिडींग करणे सुरू आहेत. गॅसचा वापर करणाऱ्या ग्राहकांची फिडींगचे काम ८१ टक्के पूर्ण झाले. १५ मेपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधीताना दिले आहेत.
यामुळे राज्यात सर्व प्रथम ठाणे जिल्ह्यात बायोमेट्रीक सिस्टीम लागू करण्याचे प्रयत्न ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी लोकमतला सांगितले.
शिधापत्रिका धारकाचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर आदींची सिडींग करणे सुरू आहेत. राज्यात सर्व प्रथम ठाणे जिल्ह्यात बायोमेट्रीक सिस्टीम लागू करण्याचे प्रयत्न ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी लोकमतला सांगितले.