पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणा ‘फेल’,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:32 AM2018-01-30T07:32:08+5:302018-01-30T07:32:19+5:30

‘डिजिटल भारत’ या स्वप्नाचा पाठलाग करताना, सर्व सरकारी आणि खासगी यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आल्या. मात्र, पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणेमुळे रेल्वे अधिकारी-कर्मचारी हैराण झाले आहेत.

 The biometric mechanism of Western Railway 'Fell' | पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणा ‘फेल’,

पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणा ‘फेल’,

Next

मुंबई : ‘डिजिटल भारत’ या स्वप्नाचा पाठलाग करताना, सर्व सरकारी आणि खासगी यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आल्या. मात्र, पश्चिम रेल्वेवरील बायोमॅट्रिक यंत्रणेमुळे रेल्वे अधिकारी-कर्मचारी हैराण झाले आहेत. दोषयुक्त बायोमॅट्रिक यंत्रणेमुळे ही यंत्रणा पूर्णपणे बंद करा आणि पूर्वीप्रमाणे मस्टर हजेरी सुरू करावी, असा सूर पश्चिम रेल्वे कामगार संघटनेने आळवला आहे. परिणामी, लाखो रुपये खर्च करून उभारलेली बायोमॅट्रिक यंत्रणा प्रत्यक्षात ‘फेल’ होत असल्याचे दिसून आले.
अधिकारी-कर्मचाºयांच्या वक्तशीरपणासाठी पश्चिम रेल्वेने बायोमेट्रिक यंत्रणा नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू केली. मात्र, ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर महिनाभरात यंत्रणेच्या त्रुटी दिसून आल्या. हजेरी न लागणे, कार्यालयात असूनही गैरहजर दाखविणे, ओळखपत्र क्रमांक न दाखविणे अशा विविध समस्यांमुळे अधिकारी-कर्मचाºयांची गैरहजेरी नोंदविली जात होती. कामावर असूनही गैरहजर दाखविल्यामुळे त्याचा फटका थेट वेतनातून दिसून येत होता. यामुळे कर्मचाºयांमध्ये संतापाचे वातावरण होते. याबाबत पश्चिम रेल्वेमध्ये ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संबंधित अधिकाºयांसोबत चर्चगेट येथे बैठक पार पडली.
बैठकीत यंत्रणेच्या त्रुटी निर्दशनास आणून दिल्या. शिवाय त्रुटी दुरुस्त करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ होती. परिणामी, प्रत्येक विभागाच्या समस्यांची माहिती घेण्यासाठी विशेष अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतची माहिती ८ डिसेंबर २०१७ रोजी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिली. मात्र, यंत्रणेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. अखेर पश्चिम रेल्वे कामगार संघटनांनी बायोमॅट्रिक यंत्रणा हद्दपार करून कर्मचाºयांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी केली आहे.

Web Title:  The biometric mechanism of Western Railway 'Fell'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.