शिधापत्रिकांच्या बायोमेट्रीक नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसरा
By Admin | Published: August 15, 2015 10:38 PM2015-08-15T22:38:51+5:302015-08-15T22:38:51+5:30
बायोमेट्रीक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० टक्के नोंदणी
- पंकज रोडेकर, ठाणे
बायोमेट्रीक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० टक्के नोंदणी पूर्ण झालेली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील अवघ्या पाच तालुक्यांमधील असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिधापत्रिकेवरील लोकसंख्याही ८ लाख ८५ हजार ८७३ इतकी आहे. त्या शिधापत्रिकेवरील धारकांच्या माहितीचे संगणकीकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने एकूण १ लाख ९४ हजार ५८० फॉर्मचे वाटप केले होते. त्यातील आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५४७ फॉर्म संकलित करण्यात आले आहेत. याचबरोबर त्यांची आधारसिंडिंगची नोंदणी केली असून ही संख्या दोन लाख ७२ हजार ९३६ इतकी आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये शहापूर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात संकलित केलेल्या फॉर्म आणि आधारसिंडिंगची संख्या सर्वाधिक आहे. बायोमेट्रीक पद्धतीने सुरू झालेल्या नोंदणीच्या वेळेस ठाणे जिल्हा ३९ क्रमांकावर होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र, सध्या ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर स्थिरावला आहे. या नोंदणीत राज्यात लातूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी लोकमतला दिली.
ठाणे जिल्ह्याचा तक्ता (ग्रामीण)
तालुकाशिधापत्रिकेवरील वाटप संकलित फॉर्मआधार सिंडिंगची
लोकसंख्या केलेले फॉर्म संख्या
भिवंडी२,५९,८७५५५,४३४४२,७७५७४,२००
शहापूर२,९२,०००६४,३९९४५,१७९८९,८१६
मुरबाड१,८५,७०६३८,४६५२५,२७३५६,०९९
अंबरनाथ०,६३,५८६१४,७४२०९,०७२१६,७३६
कल्याण०,८४,७०६२१,५४०१३,२४८३६,०८५
एकूण८,८५,८७३१,९४,५८०१,३५,५४७२,७२,९३६