भाडेकरूंचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:46 AM2020-02-16T02:46:36+5:302020-02-16T02:46:46+5:30

म्हाडा संक्रमण शिबिर । प्रतीक्षानगरपासून सुरुवात; गृहनिर्माण मंत्र्यांनी दिले आदेश

Biometric survey of tenants to be conducted | भाडेकरूंचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण

भाडेकरूंचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण

Next

मुंबई : म्हाडाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील भाडेकरूंची अ, ब, क वर्गातील पात्रता निश्चिती करण्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पथदर्शी प्रकल्प तत्त्वावर सर्वात प्रथम सायन येथील प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सायन प्रतीक्षानगरमधील संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे सर्वेक्षण झाल्यावर इतर संक्रमण शिबिरातील गाळ्यांतील भाडेकरूंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरूंच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा पात्रता निश्चितीसाठी उपयोग होणार असून इतर माहितीही म्हाडाला मिळणार आहे. संक्रमण शिबिरांमध्ये नेमके किती रहिवासी अधिकृत राहत आहेत, किती घुुसखोर आहेत याबाबतची निश्चित माहिती म्हाडाकडे नाही. ही माहिती मिळण्यासाठी म्हाडामार्फत लवकरच सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. लवकरच यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.
काही भाडेकरूंनी संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचेही दिसून आले होते. संक्रमण गाळ्यांच्या व्यवहारातून तसेच अनधिकृतरीत्या अनेक घुसखोर शिबिरांमध्ये राहत असून कोट्यवधी रुपयांचे भाडे थकल्याचे दिसून आले आहे. यामुळे हे भाडेवसुलीसाठी म्हाडाकडून संक्रमण शिबिरांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.

बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामांसाठी झोपडपट्टी सुधार मंडळ तसेच काही खासगी संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले आहे. गाळ्यांमध्ये राहत असलेल्यांच्या विविध कागदपत्रांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरची चाचपणी म्हाडा आयटी सेलकडून करण्यात येत आहे. ही माहिती कायमस्वरूपी निश्चित माहिती स्वरूपात जतनही करता येणार आहे.

Web Title: Biometric survey of tenants to be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.