जैव-तंत्रज्ञानातील करिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:29 AM2018-06-15T05:29:25+5:302018-06-15T05:29:25+5:30
पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांचे एकत्रीकरण करून जैव-तंत्रज्ञान बनते. त्यामुळे त्याची उपयुक्तताही वाढते आणि त्याची व्याप्तीही वाढते. वैद्यकशास्त्र, अन्नपदार्थनिर्मिती, कृषी आणि पर्यावरण संरक्षण, औषध उत्पादन अशा विविध क्षेत्रांत जैव-तंत्रज्ञान वापरले जाते.
पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांचे एकत्रीकरण करून जैव-तंत्रज्ञान बनते. त्यामुळे त्याची उपयुक्तताही वाढते आणि त्याची व्याप्तीही वाढते. वैद्यकशास्त्र, अन्नपदार्थनिर्मिती, कृषी आणि पर्यावरण संरक्षण, औषध उत्पादन अशा विविध क्षेत्रांत जैव-तंत्रज्ञान वापरले जाते. अगदी सोपे करून सांगायचे तर नवीन प्रकारच्या बीजांची निर्मिती करणे, प्राण्यांच्या प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करून सुदृढ प्राण्यांची निर्मिती करणे, विविध प्रकारची जंतुनाशके तयार करणे, अनुवंशिकतेमुळे उद्भवणाऱ्या व्याधींवर उपचार शोधणे, औषधांची निर्मिती करणे यांचा अंतर्भाव जैव-तंत्रज्ञानात होतो. थोडक्यात, मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी जैव-तंत्रज्ञानतज्ज्ञ झटत असतात. जैव-तंत्रज्ञानतज्ज्ञाचे काम हे मुख्यत्वे शास्त्रीय व संशोधनपर स्वरूपाचे असते.
जैव-तंत्रज्ञानतज्ज्ञांना औषधे व आरोग्यनिगा या क्षेत्रात जास्त संधी आहे. औषधे, रोगनिदान उपकरणे, रसायने, रोगप्रतिबंधक लसनिर्मिती यात हे तंत्रज्ञान प्रामुख्याने वापरले जाते. त्याचप्रमाणे कृषी व पशुसंगोपन क्षेत्रातही खूप वाव आहे. अन्नधान्याच्या सुधारित जाती-प्रजातींची निर्मिती करणे, उती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर व सूक्ष्म पद्धतीने (मायक्रो प्रॉपगेशन) अनुवंशिकतेमुळे येणारे दोष नाहीसे करणे, प्रजनन पद्धतीत सुधारणा करून उत्तम प्रतीची जनावरे तयार करणे, टिश्यू कल्चरद्वारे पिकांवरील किडीला प्रतिकार करणाºया रोपांची निर्मिती करणे हे सारे जैव-तंत्रज्ञानात समाविष्ट आहे. आता तर या तंत्रज्ञानाचा उपयोग पुष्पोत्पादन, पशुप्रजनन,
पशुआहार, मानवी अन्नपदार्थांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
नवनवीन जैव-तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने पदव्युत्तर पातळीवर होतो. पण पदवीपर्यंत शिक्षण देणाºयाही काही संस्था व विद्यापीठे आहेत. तथापि, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा कृषिशास्त्र या विषयांतील विद्यार्थ्यांनी जैव-तंत्रज्ञानासाठी प्रवेश घेतल्यास ते चांगली प्रगती करू शकतात. काही महाविद्यालयांमध्ये जैव-तंत्रज्ञान विषयात बी.एस्सी. आणि बी.टेक. पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा देऊन प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळू शकतो. तेथे जैव-तंत्रज्ञानाचा पाच वर्षांचा एम.टेक. हा अभ्यासक्रम शिकवला जातो. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फेही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याच्या अंतर्गत १९ विद्यापीठे आहेत. तेथे जैव-तंत्रज्ञान हा विषय शिकवला जातो. याशिवाय, अमृतसर येथील गुरूनानकदेव विद्यापीठात, हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात जैव-तंत्रज्ञान हा चार वर्षांचा बी.टेक. अभ्यासक्रम शिकवला जातो. दिल्ली विद्यापीठातही वनस्पती जैव-तंत्रज्ञान (प्लान्ट बायो टेक्नॉलॉजी) व जेनेटिक इंजिनीअरिंग या विषयाचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
सध्या जगभरात प्रचंड मागणी असलेले जैव-तंत्रज्ञान हे दुसरे क्षेत्र आहे. जैव-तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत. विविध संशोधन संस्थांमध्ये त्यांना नोकरी मिळू शकते. औषध निर्मिती कंपन्यांमध्येही अशा उमेदवारांना चांगली संधी आहे. या कंपन्या संशोधनासाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देत असतात. रासायनिक उत्पादन क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण, कचरा निर्मूलन, ऊर्जा, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग यांत जैव-तंत्रज्ञानतज्ज्ञांना चांगली मागणी असते. अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही सायंटिफीक अधिकारी म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञांना नियुक्त केले जाते.
नवीन प्रकारच्या बीजांची निर्मिती करणे, प्राण्यांच्या प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करून सुदृढ प्राण्यांची निर्मिती करणे, विविध प्रकारची जंतुनाशके तयार करणे, अनुवंशिकतेमुळे उद्भवणाºया व्याधींवर उपचार शोधणे, औषधांची निर्मिती करणे यांचा अंतर्भाव जैव-तंत्रज्ञानात होतो.