‘बिपाेरजॉय’नेच पळवला पाऊस; महाराष्ट्रात कधी येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:00 AM2023-06-20T06:00:19+5:302023-06-20T06:01:02+5:30

सोमवारी मान्सूनचा काहीसा पट्टा ईशान्येकडील राज्यात दाखल झाला. असे असले तरी मान्सून मुंबईत २३ जूननंतरच दाखल होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

'Bipaerjoy' drove the rain; When will it come to Maharashtra? | ‘बिपाेरजॉय’नेच पळवला पाऊस; महाराष्ट्रात कधी येणार? 

‘बिपाेरजॉय’नेच पळवला पाऊस; महाराष्ट्रात कधी येणार? 

googlenewsNext

मुंबई : अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळाचा काही अंश आता राजस्थानसह लगतच्या प्रदेशावर असून, वादळाने हवेतील बाष्प ओढून नेले आहे. परिणामी मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्यक बाष्पाचे प्रमाण घटले आहे. चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर मान्सून येण्यास किंवा स्थिर होण्यास किमान दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रही तयार झालेले नाही. यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास विलंब होत आहे. सोमवारी मान्सूनचा काहीसा पट्टा ईशान्येकडील राज्यात दाखल झाला. असे असले तरी मान्सून मुंबईत २३ जूननंतरच दाखल होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

मान्सून सध्या कुठे? 
हवामानशास्त्र विभागानुसार मान्सून पश्चिम-मध्य व उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या राज्यांत दाखल झाला आहे. 

महाराष्ट्रात कधी येणार? 
२३ जूननंतर मुंबईत पाऊस सुरु होईल. जून अखेरीस २५ ते २७ तारखेदरम्यान राज्यात चांगल्या पावासची शक्यता.   
पुढील पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान शास्त्र विभाग

Web Title: 'Bipaerjoy' drove the rain; When will it come to Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.