बर्ड फ्लूबाधित भागातील कोंबड्या मारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:00 AM2021-01-12T07:00:16+5:302021-01-12T07:00:30+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी घेतली. त्यानंतर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १२०५ पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून यापैकी १ हजार कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्या असताना या रोगाचा संसर्ग झालेल्या एक किलोमीटर च्या परिसरातील कोंबड्या मंगळवार पासून मारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी घेतली. त्यानंतर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बर्ड फ्लूला अटकाव करण्यासाठी अलर्ट मोडवर राहून काम करा, असे त्यांनी सांगितले. सोमवारी दिवसभरात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया, चंद्रपूर, या भागांतील पक्षांचे नमुने बर्ड फ्लू संसर्गाचे पॉझिटिव आढळले आहेत. आणखी काही ठिकाणचे
नमुने भोपाळ येथे पाठवण्यात आले आहेत. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.