Join us  

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रतीक्षा संपणार

By admin | Published: June 19, 2014 2:22 AM

जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्रांवर कार्याकरी आरोग्य अधिकाऱ्यांची डिजिटल सही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़

मुंबई : जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्रांवर कार्याकरी आरोग्य अधिकाऱ्यांची डिजिटल सही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ त्यामुळे सब रजिस्ट्रारच्या प्रतीक्षेत ताटकळत बसणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे़जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची संगणकीय प्रत संबंधित वॉर्डातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सही व शिक्क्यासाठी पाठविली जाते़ ही प्रत वेळेवर मिळण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो़ त्यामुळे विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रामार्फत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची डिजिटल सही व शिक्का असलेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची संगणकीय प्रत देण्याची ठरावाची सूचना आॅक्टोबर २०१३ मध्ये पालिका सभागृहात मंजूर करण्यात आली़त्यानंतर ही ठरावाची सूचना आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती़ त्यानुसार ही मागणी मान्य करीत कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांची डिजिटल सही सर्व २४ विभागांमध्ये नागरी सुविधा केंद्रांमार्फत संगणकीय प्रमाणपत्रावर उपलब्ध करून देण्याची अनुकूलता कुंटे यांनी दाखविली आहे़ त्यामुळे ही प्रमाणपत्रे नागरिकांना झटपट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ (प्रतिनिधी)