मुंबईत मुलींचा जन्मदर आहे समाधानकारक, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 07:29 AM2020-12-21T07:29:09+5:302020-12-21T07:29:41+5:30

Mumbai : २०१५-१६ सालच्या तुलनेत शहर- उपनगरातील मुलींचा जन्मदर वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. २०१५-१६ साली मुंबईत मुलींचा जन्मदर ९०६ इतका होता, तर उपनगरात हे प्रमाण ८६९ इतके होते.

The birth rate of girls in Mumbai is satisfactory, according to the National Family Survey | मुंबईत मुलींचा जन्मदर आहे समाधानकारक, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण

मुंबईत मुलींचा जन्मदर आहे समाधानकारक, राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण

Next

मुंबई : मुंबईत मुलींचा जन्मदर वाढल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवालानुसार, मुंबईत हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९३९ इतके आहे, तर उपनगरात हे प्रमाण ९२१ इतके आहे. २०१५-१६ सालच्या तुलनेत शहर- उपनगरातील मुलींचा जन्मदर वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. २०१५-१६ साली मुंबईत मुलींचा जन्मदर ९०६ इतका होता, तर उपनगरात हे प्रमाण ८६९ इतके होते.
राज्य शासनातर्फे ‘पीसीपीएनडीटी’ कायदा लागू करून गर्भलिंग निदानावर बंदी आणण्यात आली. याशिवाय २०१५ पासून राज्यभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’ राबविल्याने मुलींचा जन्मदर वाढविण्यास यश मिळत आहे. मात्र, शासनाचा उद्देश एक हजार मुलांमागे ९९४ मुली असा आहे. 
राज्यात २०१३ मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण एक हजार मुलांमागे फक्त ९०० होते. जे २०१३-२०१४ मध्ये ९१४ वर सुधारले गेले, पण २०१५ मध्ये हे प्रमाण कमी होऊन ९०७ वर पोहोचले होते. २०१६ आणि २०१७ मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे ९०४ आणि ९१३ आहे. २०१८च्या  अहवालानुसार, हे प्रमाण ९१६ वर सुधारले आहे. यंदाच्या अहवालानुसार, राज्यात शहरी भागांतील हे प्रमाण ९५४ असून ग्रामीण भागात ९७७ आहे. 
पश्चिम महाराष्ट्रात दरहजारी मुलींचा जन्मदर मोठी प्रगती दर्शवितो. कोल्हापूर (६५१ ते ९३७) सांगली (९१३ ते १,०१२) सोलापूर (८१५ ते ९६०) यासह धुळे, लातूर, रायगड, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या आकडेवारीतही लक्षणीय प्रगती आहे. त्याउलट पुणे, नाशिक, औरंगाबाद या प्रगत म्हणवणाऱ्या जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर खालावला आहे. बीड, जालना, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांत तर तो अधिकच कमी झालेला आहे. राष्ट्रीय स्तराचा विचार केला असता, देशातल्या आठ राज्यांत कमी झालेले लिंग गुणोत्तर ही चिंताजनक बाब आहे. 

प्रजनन दरात झाली घसरण
राज्यातील महिलांमध्ये प्रजनन दर हा १.९ टक्के इतका होता. यंदाच्या अहवालानुसार,  हा दर १.७ टक्के झाला आहे. या प्रमाणामध्ये दोन टक्क्यांची घट दिसत असली, तरी विवाहाचे वाढलेले वय, कुटुंब नियोजनाच्या सुविधांचा योग्य प्रकारे केलेला वापर किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या अनारोग्याच्या तक्रारीं प्रजनन क्षमता घटल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The birth rate of girls in Mumbai is satisfactory, according to the National Family Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई