वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:15 PM2020-08-08T16:15:45+5:302020-08-08T16:22:58+5:30

तेजस ठाकरे यांचा ७ ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तेजसने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने त्याला अनोख गिफ्ट मिळालं आहे.

Birthday gift from father CM Uddhav Thackeray to son Tejas Thackeray | वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...

वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...

Next
ठळक मुद्देतेजस ठाकरे हे वन्यजीव व प्राणीमित्र आहेतयापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.वनामध्ये जमिनीवरील गोगल गाईचं संशोधन करण्याची परवानगी मिळाली

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे याचा शुक्रवारी वाढदिवस झाला, या वाढदिवसानिमित्त तेजसला वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून अनोखं गिफ्ट मिळालं आहे. पश्चिम घाट संरक्षित क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी तेजसने महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता, या संदर्भात वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

तेजस ठाकरे यांचा ७ ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तेजसने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने त्याला अनोख गिफ्ट मिळालं आहे. या अभ्यासासाठी तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना उत्तर पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगल गाईचं संशोधन करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारच्या वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास असलेला पश्चिम घाट हा आकर्षण केंद्र आहे. फक्त झाडांवर राहणाऱ्या बेडकांची अंडी खाणाऱ्या मांजऱ्या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरेंनी लावला होता. त्याला सापाला ‘ठाकरेंचा मांजऱ्या साप’ म्हणून नाव देण्यात आलं. तेजस ठाकरे यांनी पहिल्यांदा हा साप पश्चिम घाटामध्ये पाहिला होता. तेजस यांना हा साप वेगळा वाटला आणि त्याची माहिती त्यांनी मला दिली. त्यावर मी पुढे संशोधन सुरू केले. या सापाची बरीच माहिती तेजस ठाकरे यांनी संशोधक वरद गिरी यांना  दिली होती. तेजस ठाकरे हे वन्यजीव व प्राणीमित्र आहेत. तेजस आणि त्यांच्या टीमने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत.

यापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आलं होतं. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची आवड आहे. याच आवडीतून त्याची विविध ठिकाणी भ्रमंती सुरू असते. कोकणातील जंगलात दुर्मिळ सापांच्या जाती शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजसला सावंतवाडीजवळच्या रघुवीर घाटावर असलेल्या धबधब्यात खेकड्यांच्या पाच नव्या जाती सापडल्या आहेत.

Web Title: Birthday gift from father CM Uddhav Thackeray to son Tejas Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.