मुंबई - सुप्रसिद्ध बाईक रेसर आणि महिला मोटर सायकल प्रशिक्षक चेतना पंडित (वय - २७) हिने राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चेतनाच्या घरात सुसाइड नोट सापडली असून दिंडोशी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात ती होती. यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले असे पोलीस सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होती. चेतना पंडित गोरेगाव पूर्व येथील पद्मावती सोसायटीत तीन मैत्रिणींसह भाड्याने राहत होती. सोमवारी रात्री घरी कोणीही नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मैत्रिणी फ्लॅटमध्ये परतल्या असता चेतना दरवाजा उघडत नव्हती. चेतनाचा मोबाईल फोनदेखील नॉट रिचेबल होता. अखेरीस त्यांनी चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडला असता चेतना यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. चेतना यांचे प्रियकराशी ब्रेक अप झाले होते. यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे, असं तिनं सुसाइड नोटमध्ये नमूद केलं आहे. चेतनाच्या मागे तिचा एकुलता एक भाऊ आहे. सुसाइड नोटमध्ये तिनं भावाची माफीही मागितली आहे. दिंडोशी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
प्रेमभंगातून बाईक रेसरने केली आत्महत्या ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 1:36 PM