भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:59 AM2024-09-26T07:59:51+5:302024-09-26T08:00:01+5:30

भाजपने १५५ जागा लढविल्या, तर शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा

BJP 150 plus for assembly election and remaining seats to friends discussion was held in the meeting with Amit Shah | भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा

भाजप १५०+ तर उर्वरित जागा मित्रांना! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत झाली चर्चा

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची जी बैठक झाली, त्यात भाजपने १५० ते १६० जागा लढाव्यात आणि मित्रपक्ष असलेली शिंदेसेना आणि अजित पवार गटाने उर्वरित जागा लढवाव्यात, असे शाह यांनी सुचविल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दीर्घ चर्चा केली. १५० ते १६० जागा भाजपने लढवाव्यात आणि उर्वरित आपसात कशा वाटून घ्यायच्या याचा निर्णय शिंदे-अजित पवार यांनी फडणवीस यांना सोबत घेऊन करावा. भाजप कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा लढणार नाही, असे कालच्या बैठकीत भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप १५५ च्या आसपास जागा लढेल, असे चित्र बैठकीतून समोर आले. 

३९ जागांची वाटणी कशी होणार?

भाजपने १५५ जागा लढविल्या, तर शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील. १५५ पेक्षा भाजप जेवढ्या कमी जागा लढेल तेवढ्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील.

शिंदे यांच्यासोबत स्वत:चे ४० व १० अपक्षांसह ५० आमदार आहेत. 

अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या तीन आमदारांसह ४४ आमदार आहेत.

शिंदे व अजित पवार गट मिळून आमदार संख्या ९४ इतकी आहे. सिटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यानुसार या जागा अनुक्रमे शिंदेसेना व अजित पवार गटाला मिळतील. 

मग ३९ जागा उरतील. त्या दोन पक्ष कशा वाटून घेतात त्यावर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अवलंबून असेल. भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्रपक्षांसाठी काही जागा सोडणार आहे.

Web Title: BJP 150 plus for assembly election and remaining seats to friends discussion was held in the meeting with Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.