Join us  

मांस निर्यातीविरोधात भाजपा आक्रमक

By admin | Published: June 19, 2014 2:23 AM

मांस निर्यातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे देवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात करण्याचा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्याची मागणी भाजपाने केली आहे़

मुंबई : मांस निर्यातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे देवनार कत्तलखान्यातून मांस निर्यात करण्याचा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्याची मागणी भाजपाने केली आहे़ मात्र स्थायी समितीच्या पटलावरून हा प्रस्ताव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे़देवनार कत्तलखान्यातून मोठ्या प्रमाणात मांस निर्यात होते़ ही निर्यात बंद करण्यावरून असंख्य वेळा भाजपा आणि प्रशासन आमने-सामने आले आहे़ परंतु या कत्तलखान्यात काम करणारे व्यापारी, दलाल आदींचा रोजगार निर्यातीवर अवलंबून असल्याचा दावा प्रशासनाने केला़ याबाबतचा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे़मात्र ह्यअ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाह्ण विरुद्ध ह्यए नागराजा आणि इतरह्ण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मांस निर्यातीस नुकतीच मनाई केली आहे़ ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून मांस निर्यात बंद करण्याची मागणी भाजपाचे पालिकेतील उपाध्यक्ष दिलीप पटेल यांनी केली आहे़ या प्रकरणी विधी खात्याकडून कायदेशीर मतही मागविण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)