मुंबईः भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. भाजपानं मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. शिवेंद्रराजे सातारा विधानसभा मतदारसंघातून, तर सुधीर मुनगंटीवार बल्लालपूर, गिरीश महाजन यांना भाजपानं जामनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. नंदुरबार- विजयकुमार गावित, शहादा- राजेश पाडवी, नवापूर- भरत गावित, धुळे ग्रामीण- ज्ञानज्योती पाटील, सिंदखेडा- जयकुमार रावल, रावेर- हरिभाऊ जावळे, भुसावळ- संजय सावकारे, जळगाव शहर- सुरेश भोळे, अंमळनेर- शिरीश चौधरी, चाळीसगाव- मंगेश चव्हाण, मलकापूर- चैनसुख संचेती, चिखली- श्वेता महाले, खामगाव- आकाश फुंडकर, जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे, अकोट- प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा, अकोला पूर्व- रणधीर सावरकर, मूर्तिजापूर- हरिश पिंपळे, वाशिम- लखन मलिक, करंजा- डॉ. राजेंद्र पटणी, अमरावती- डॉ. सुनील देशमुख, दर्यापूर- रमेश बुंदिले, मोर्शी- डॉ. अनिल बोंडे, आर्वी- दादाराव केचे, हिंगणघाट- समीर कुणावर, वर्धा- पंकज भोयर, सावनेर- डॉ. राजीव पोतदार, हिंगणा- समीर मेघे, उमरेड- सुधीर पार्वे, नागपूर दक्षिण- मोहन मेटे, नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे, नागपूर मध्य- विकास कुंभारे, नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, नागपूर उत्तर- मिलिंद माने, अर्जुनी-मोरगाव- राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर तिरोरा- विजय रहांगदाळे, आमगाव- संजय पुरम, अरमोरी- कृष्णा गजबे, गडचिरोली- देवराव होली, राजुरा- संजय धोत्रे, चंद्रपूर- नाना श्यामकुळे, चिमुर-कीर्तीकुमार भांगडिया, वणी- संजीव बोधकुरवर, राळेगाव- अशोक उईके, यवतमाळ- मदन येरावार यांना भाजपानं संधी दिली आहे. अर्णी - संदीप प्रभाळकर धुर्वे, भोकर- बापूसाहेब गोर्थेकर, मुखेड- तुषार राठोड, हिंगोली -तानाजी मुटकुळे, परतूर - बबनराव दत्तात्रय लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, भोकरदन- संतोष रावसाहेब पाटील-दानवे, फुलंब्री - हरिभाऊ बागडे, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, गंगापूर - प्रशांत बंब, चांदवड - राहुल अहेर, नाशिक मध्य- देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम- सीमा हिरे, डहाणू- प्रकाश धनारे, विक्रमगड - हेमंत सावरा, भिवंडी पश्चिम- महेश चौगुले, मुरबाड -किसन काथोरे, कल्याण पूर्व - गणपत काळू गायकवाड, डोंबिवली- रवींद्र चव्हाण, मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता, ठाणे- संजय केळकर, ऐरोली- संदीप नाईक, बेलापूर - मंदा म्हात्रे, दहिसर- मनीषा चौधरी, मुलंड - मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर, चारकोप- योगेश सागर, गोरेगाव- विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम- अमित साटम, विलेपार्ले - पराग अळवणी, घाटकोपर पश्चिम - राम कदम, वांद्रे पश्चिम - आशिष शेलार, सायन कोळीवाडा - तमील सेल्वन हे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.