भाजपची नवी टीम जाहीर; तावडे, पंकजा मुंडेंना स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 06:12 AM2020-09-27T06:12:58+5:302020-09-27T06:13:36+5:30
राष्ट्रीय कार्यकारिणी : सुनील देवधर, विजया रहाटकर, हीना गावित यांचाही समावेश
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपाने मोठे संघटनात्मक बदल करीत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारी घोषित केली.
महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, हिना गावित आणि व्ही. सतीश यांची कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. नव्या चेहऱ्यांना संधी देताना फायरब्रँड नेते तेजस्वी सूर्या यांच्याकडे भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आठ महिन्यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. नव्या बदलांत १२ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ८ राष्ट्रीय महासचिव नेमण्यात आले आहेत. यातील कोणतेही पद महाराष्ट्रातील नेत्याला दिले गेलेले नाही. युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा यांचे अध्यक्षही नियुक्त करण्यात आले आहेत. २३ प्रवक्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देतानाच काही जुने चेहरे कायम ठेवण्यात आले आहेत.
तीन राष्ट्रीय सह-संघटन महासचिव नेमताना एक पद महाराष्ट्रातील व्ही. सतीश यांना देण्यात आले आहे. १३ राष्ट्रीय सचिव नेमण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर या चौघांची वर्णी लागली आहे. विजया रहाटकर या याआधी राष्ट्रीय कार्यकारिणीत महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. २३ राष्ट्रीय प्रवक्त्यांत महाराष्ट्रातील खासदार हिना गावित आणि संजू वर्मा यांचा समावेश आहे.
उत्त्तर प्रदेशचे माजी वित्तमंत्री राजेश अग्रवाल यांना कोषाध्यक्ष, तर मध्यप्रदेशातील मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता यांना सहकोषाध्यक्ष करण्यात आले आहे. उत्त्तराखंडमधील खासदार अनिल बलुनी यांना मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता आणि माध्यम
प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे
राम माधव, पुनम महाजन, विनय सहस्त्रबुद्धे कार्यकारिणी बाहेर
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया खा. पुनम महाजन आणि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह श्याम जाजू यांना कार्यकारिणीच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. पुनम महाजन यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. सहस्त्रबुद्धे हे आयसीसीआरचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. राम माधव, मुरलीधर राव, अनिल जैन आणि सरोज पांडे यांना महासचिव पदावरून हटवून त्यांच्या जागी दुष्यंतकुमार गौतम, डी. पुरंदरेश्वरी, सी. टी. रवि आणि तरुण चुग यांना आणण्यात आले आहे.
मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भाजपाच्या नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले की, नव्या टीमला माझ्याकडून मन:पूर्व शुभेच्छा. मला विश्वास आहे की, ते आमच्या पक्षाच्या गौरवशाली परंपरेचे नि:स्वार्थ भावाने तसेच समर्पणासह पालन करतील. गोरगरिबांना सशक्त बनविण्यासाठी ते कठोर मेहनत करतील.
पुनम महाजन यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. सहस्त्रबुद्धे हे आयसीसीआरचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. राम माधव, मुरलीधर राव, अनिल जैन आणि सरोज पांडे यांना महासचिव पदावरून हटवून त्यांच्या जागी दुष्यंतकुमार गौतम, डी. पुरंदरेश्वरी, सी. टी. रवि आणि तरुण चुग यांना आणण्यात आले आहे.
राम माधव, पूनम महाजन, विनय सहस्रबुद्धे कार्यकारिणीबाहेर
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया खा. पूनम महाजन आणि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह श्याम जाजू यांना कार्यकारिणीच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे.