आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 02:06 PM2019-04-14T14:06:38+5:302019-04-14T14:07:15+5:30

रामदास आठवले यांच्यापाठोपाठ सगळेच राजकीय नेते आठवले शैलीप्रमाणे प्रचारात रंगत आणत आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत.

BJP Ashish Shelar And Congress Sachin Sawant criticized each other on twitter | आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली

आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली

Next

मुंबई -  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आणण्यासाठी राजकीय नेते एकमेकांवर शेरो-शायरीच्या माध्यमाचा वापर करत आहेत. रामदास आठवले यांच्यापाठोपाठ सगळेच राजकीय नेते आठवले शैलीप्रमाणे प्रचारात रंगत आणत आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत. मागील काही दिवसांपासून ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार विरोधकांवर खास शैलीत ट्विट करत समाचार घेत आहेत. तर आशिष शेलारांच्या आठवले शैलीला विरोधकही त्याच भाषेत टोला लगावत आहेत.

काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार पुन्हा चर्चेत आले आहेत, ट्विटरवरुन आशिष शेलारांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावत लिहिलं आहे की,  
एक चव्हाण नांदेडच्या बाहेर पडत नाहीत..
दुसऱ्या चव्हाणांना कराडच्या बाहेर कोण बोलवत नाहीत.
संगमनेरच्या थोरातांचं कोण ऐकत नाहीत..
नेत्यांची “उसणवारी”करुन उमेदवार लढत आहेत..
फाटक्या पक्षात ठिगळं जोडून प्रचार करत आहेत.. 
60 वर्षांच्या पापाचे घडे आता भरत आहेत!


आशिष शेलारांनी केलेल्या या ट्विटमुळे एकाच वेळेला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना टोला लगावला आहे. तर राज ठाकरे यांची सभा घेत काँग्रेस नेत्यांची उसणवारी करुन उमेदवारी लढत आहे असा चिमटा काँग्रेसला काढला. 

आशिष शेलारांच्या या ट्विटला लागलीच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवरुन त्याच शैलीत उत्तर दिलंय. 

एक खडसे घराबाहेर पडत नाही
दुसरा पिस्तुल्या फायटींगशिवाय काही करत नाही
जालन्याच्या दानवेला शहाणा कोणी म्हणत नाही
शिवसैनिकांना घाबरत शेलारांना कोणी बोलवत नाही
विकास वेडा करून जुमलेबाज शहीदांनाही विकत आहेत
शहाण्या बापजाद्यांनी ६० वर्ष नाही दिली सत्ता
#ChowkidarChorHai लोक म्हणत आहेत




भाजपाच्या निवडणूक प्रक्रियेतून वगळलेले एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासोबत आशिष शेलारांनाही निवडणुकीच्या प्रचाराला कोणी बोलवत नाही असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचसोबत भाजपा जुमलेबाजी करत शहिदांच्या नावाने मतं मागत आहे असा आरोप करत चौकीदार चोर है असं लोकं म्हणत असल्याचा प्रतिटोला सचिन सावंत यांनी आशिष शेलारांना लगावला.

Web Title: BJP Ashish Shelar And Congress Sachin Sawant criticized each other on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.